वॉर्ड नंबर पाच, केईएम (Marathi)

Dr.Ravi Bapat

Physical

In Circulation

प्रथितयश डॉक्टर होणे आणि रुग्णांना बरे करून त्यांचे प्रेम, जिव्हाळा, विश्वास मिळविणे हे बहुतेक डॉक्टरांचे स्वप्न असते. डॉ. रवी बापट यांचे हे स्वप्न पूर्ण झाले. मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयात ४० वर्षांपेक्षा अधिक काल त्यांनी रुग्ण सेवा केली.

जठरासारख्या आतड्यावर शल्यचिकित्सा करताना रुग्णांना विश्वासात घेऊन त्यांनी अनेक नवे प्रयोग यशस्वी करून दाखविले. रूग्णालयातील वॉर्ड नंबर पाचमध्ये त्यांच्या बहुतांश वेळ गेला. तो वॉर्ड, तेथे दाखल होणारे रुग्ण, नर्स, वॉर्डबॉय, विद्यार्थी, कर्मचारी यांच्या आठवणी डॉ. बापट यांच्या मनात कायम घर करून राहिल्या आहेत. त्या त्यांनी 'वॉर्ड नंबर पाच, केईएम'मधून वाचकांपर्यंत पोचविल्या आहेत.

डॉक्टरांचे बालपण, शिक्षण, व्यवसाय, आप्त, कुटुंब, पत्रकार, राजकारणी मित्र व रुग्ण, स्वतःचे अवांतर उद्योग, आजारपण, रुग्णांशी संवाद, आजचे वैद्यकशास्त्र याविषयी त्यांनी मनमोकळेपणाने लिहिले आहे. यशस्वी डॉक्टरांचे हे अनुभवसमृद्ध लेखन वाचताना या क्षेत्राविषयी, डॉक्टर-रुग्ण नाते याचे वेगळे दर्शन होते. याचे शब्दांकन सुनीती जैन यांनी केले आहे.

Language Marathi
ISBN-10 8186184953
ISBN-13 9788186184950
No of pages 301
Font Size Medium
Book Publisher rohan Prakashan
Published Date 01 Jan 2006

About Author

Author : Dr.Ravi Bapat

1 Books

शरद पवार ते सतीश राजे दादा कोंडके ते दतू मिस्त्री रुग्ण कुणीही असो त्याची पत प्रतिष्ठा न पाहता. शल्यचिकित्सक डॉक्टर बापटांनी सारख्याच आपुलेकीने उपचार केले… डॉ. रवी बापट यांचे अनुभवकथन

Related Books