कसा असावा मुलांचा आहार ? (Marathi)

Pro. Rassika Deshmukh

Physical

Available

'घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिल्लांपाशी' या उक्तीप्रमाणे आजच्या व्यस्त जीवनशैलीतही आईचे-मग ती गृहिणी असो वा नोकरी करणारी तिचे संपूर्ण लक्ष आपल्या मुलांच्या विकासाकडे असते, याबाबत कोणाचेही दुमत होणार नाही.

मुलांचा आहार हा तर आईच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय. मुलांच्या विकासातील त्याची भूमिका अनन्यसाधारण असते. त्यामुळे प्रत्येक सुजाण आईला मुलांनी काय खावे व का खावे हा प्रश्न पडतोच. किंबहुना पडायलाच हवा. विशेषत: आजच्या काळात मुले व पालक दोघेही 'इन्स्टंट फूड' संस्कृतीकडे ओढले जात असताना या प्रश्नाचे महत्त्व अधिकच वाढते.

प्रत्यक्ष आचरणात आणता येतील अशा रीतीने दिलेल्या शास्त्रोक्त माहितीचा मुद्देसुद मांडणी हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. आपण मुलांना देत असलेला आहार हा त्यांच्या विकासासाठी पायाभरणीचे काम करीत असतो, ही जाणीव असणाऱ्या प्रत्येक सुज्ञ पालकांनी नेहमी संग्रही ठेवावे असे उपयुक्त पुस्तक.

Language Marathi
ISBN-10 8177866729
ISBN-13 9788177866728
No of pages 149
Font Size Medium
Book Publisher Saket Publication
Published Date 01 Jan 2016

About Author

Author : Pro. Rassika Deshmukh

1 Books

मुलांच्या उत्तम शारीरिक, बौद्धिक वाढीसाठी अत्यंत उपयुक्त

Related Books