झपुर्झा भाग 3 (Marathi)

Achyut Godbole

Physical

In Circulation

श्री. अच्युत गोडबोले हे मराठीतील एक ख्यातनाम लेखक आहेत. त्यांनी विज्ञानापासून साहित्यापर्यंत लिहिलेल्या अनेक पुस्तकांनी वाचकप्रियता तर मिळविलीच, पण विक्रीचेही उच्चांक प्रस्थापित केले. सध्या 'झपूर्झा' ही ग्रंथमालिका अशीच लोकप्रिय झालेली आहे. जगभरातील महत्त्वाच्या लेखकांचा वेध या मालिकेमधून घेतला जातो आहे. हा 'झपूर्झा'चा तिसरा खंड. पूर्वीच्या दोन खंडांप्रमाणे याही खंडाचे लेखन अच्युत गोडबोले आणि नीलांबरी जोशी यांनी केले आहे. जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या लेखनाचा वेध घेणे ही मोठीच अवघड अशी गोष्ट आहे. त्यासाठी प्रचंड वाचन आणि व्यासंग यांची आवश्यकता असते. या दोन्ही बाबी या लेखकद्वयांमध्ये आहेतच, पण आपले लेखन वाचनीय व्हावे यासाठी येथे फार कष्ट घेण्यात आलेले आहेत. अतिशय ओघवती भाषा, अभ्यासपूर्ण असे विवेचन आणि साहित्यासंबंधीची सूक्ष्म जाण ही पुस्तके वाचताना अनुभवास येते. या खंडाचेही हे वैशिष्ट्य आहेच.

आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, लेखकाच्या महत्त्वाच्या कलाकृतींचा परिचय लेखकद्वय घडवितातच; पण लेखकाचे वैयक्तिक जीवन, त्यांचा काळ आणि त्या काळाशी असणारा संबंध असा एक मोठा पटच येथे उभा केला जातो. त्यातून तो तो लेखक सर्वार्थाने साक्षात होऊन वाचकांशी संवाद करायला लागतो. मला वाटते, हे या ग्रंथांचे मोठेच यश म्हटले पाहिजे. आपले साहित्य समृद्ध करावयाचे असेल अगर आपल्या भाषेतील लेखकांचे साहित्य श्रेष्ठ व्हावयाचे असेल, तर असे जागतिक पातळीवरील महत्त्वाचे लेखक आपल्या भाषेत आणणे हे मोठेच मौलिक आणि ऐतिहासिक कार्य असते. असे एक मौलिक आणि ऐतिहासिक कार्य अच्युत गोडबोले आणि नीलांबरी जोशी करीत आहेत. त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच असतील. 

Language Marathi
ISBN-10 9383850868
ISBN-13 9789383850860
No of pages 403
Font Size Medium
Book Publisher manovikas prakashan
Published Date 01 Jan 2017

About Author

Author : Achyut Godbole

6 Books

Related Books