सन्स ऑफ फॉर्च्यून (Marathi)

Jeffrey Archer Trans. Aajit Thakur

Physical

In Circulation

एक इस्पितळातील प्रसूतिविभागात कमालीची सामसूम होती - नुकतंच जन्मलेलं एक अर्भक दगावलं होतं - पण त्याच वेळी तिथे जन्माला आलेलं एक जुळं मजेत जगाकडे पाहत होतं. सकाळ झाली तेव्हा प्रसूतीसाठी आलेल्या एका आईला सांगण्यात आलं की तिचं आता प्रथमच तग धरून राहिलेलं बाळ ठीक-ठाक आहे - आणि दुसर्‍या खोलीत असलेल्या एका आईला सांगण्यात आलं की जुळी झाली होती; पण दुर्दैवाने एक बाळ कालवश झालं.

नाथानील कार्टराइट आणि फ्लेचर डेव्हनपोर्ट खरं म्हणजे जुळे भाऊ म्हणून जन्माला आले; पण दोघे अगदी भिन्न भिन्न जगात वाढले आणि त्यांच्या पिढीमधील अत्यंत हुशार आणि बुद्धिमान तरुण म्हणून दोघेही आपापल्या जीवनात पुढे गेले. हिंसाचार, मुक्त प्रेमव्यवहार आणि आंधळी महत्त्वाकांक्षा या मूल्यांनाच जिथे महत्त्व होते, अशा काळात नॅट देशातर्फे युद्ध लढण्यासाठी दूरदेशी गेला आणि फ्लेचरने इकडे राजकारणात प्रवेश केला. त्यांच्या प्रत्येक दु:खाच्या आणि आनंदाच्या क्षणात, प्रेमाच्या संबंधात, कामकाजाच्या संदर्भात- आयुष्यात केलेल्या प्रत्येक निवडीमध्ये त्यांच्या जीवनात आश्चर्यकारकपणे एकमेकांचे प्रतिबिंब आढळत असे.

वेगवेगळ्या मार्गाने वाटचाल करीत असताना अचानक एका गाजलेल्या खून खटल्यामुळे ते दोघे एकत्र येतात. उच्च राजकीय पदासाठी दोघेही एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनतात. - आणि आपापल्या कर्तबगारीने वर आलेल्या या दोन शक्तींपुढे खरे सत्य उभे राहते-

आणि पुढे ?

Language Marathi
ISBN-10 8177665987
ISBN-13 978-8177665987
No of pages 496
Font Size Medium
Book Publisher Mehta Publishing house
Published Date 01 Sep 2005

About Author

Related Books