आदर्श जीवन (Marathi)

Balvantrav Khot

Digital

Available

आयुष्याच्या उत्तरार्धात लेखनाला सुरुवात केली. याला कारण माझा लहानभाऊ. काळाच्या ओघात आणि संसाराच्या रगाड्यांत लेखन करावे हे कळलेच नाही. पण भावना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे लिखाण ह्याची जाणीव झाली व आम्ही आपल्या आई बाबांवर लिखाण करावे असे ठरविले व त्यातून पुढील भावना आपोआपच कागदावर उतरल्या.

आठवणीच्या साठवणीतील आम्हाला आठवत असलेले आईबाबांचे चरित्र, व्यक्तिमत्त्व, ममत्व, स्वाभिमानीपणा, परोपकार, यशस्वी शब्दरूपात व्यक्त करून ठेवणे जेणे करून ते आमच्या मुलांना, नातवांना व येणाऱ्या नवीन पिढीला मार्गदर्शन करणारे ठरेल. आपल्या आजी आजोबांच्या कर्तव्याचे आलेख त्यांच्या नजरेखालून गेले तर ते त्यांच्या हृदयातही साठविले जातील व संस्काराची बिजे आपोआपच मनात रोवली जातील. जुन्या काळातील या लोकांची जीवनगाथा नवीन पिढीला निश्चितच मार्गदर्शक ठरू शकेल, प्रेरणा देणारी ठरेल ती तशी प्रेरणादायी ठरावी यासाठीच हा प्रयत्न. ह्या कामात माझी बहिण सौ. कल्पना इंदूरकर हिची फार मदत झाली.

- वत्सला अनंतराव बोधनकर

   
Language Marathi
No of pages 80
Book Publisher Vishwakarma Publications
Published Date 01 Jan 2020

About Author

Author : Balvantrav Khot

NA

Related Books