Abhedya te Bhedtana (Marathi)

Tamanna Inamdar

Digital

Available

अभेद्य ते भेदताना : आंतरधर्मीय विवाहित जोडप्यांचे अनुभव धर्म आणि जातीच्या भिंती आज एकविसाव्या शतकातही अभेद्य आहेत. जेथे आपला समाज अजूनही आंतरजातीय विवाह मान्य करत नाही, तेथे आंतरधर्मीय विवाहाची कल्पनाही सहन होत नाही. धर्माधर्मांमध्ये व जातीजातींमध्ये द्वेष व तिरस्कार विकोपाला जात आहे. विशेषतः हिंदू व मुस्लीम या समाजांमध्ये परस्परांबद्दल प्रचंड संशय आहे. या समाजांतील परस्पर विवाहांबाबत 'लव्ह जिहाद' व 'घरवापसी' या शब्दांनी वातावरण कलुषित केले आहे. या पार्श्वभूमीवर, आपल्या प्रेमाच्या व भारतीय संविधानाच्या साक्षीने आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांचे अनुभव या पुस्तकात मांडले आहेत. आत्यंतिक त्रास, कुटुंब व समाजाच्या प्रखर विरोधाचा सामना करत आपले प्रेम, विवेक व सारासार बुद्धी जागी ठेवून ही अभेद्य भिंत भेदण्याची धडाडी या जोडप्यांनी दाखवली आहे. आपल्या पुढच्या पिढीत सर्वधर्मसमभावाची - धर्मनिरपेक्षतेची रुजवण करत ते भविष्यकाळ बदलण्याची धडपड करत आहेत. त्यांचे प्रेरक अनुभव या पुस्तकात आहेत.

   
Language Marathi
No of pages 120
Book Publisher Vishwakarma Publications
Published Date 12 Aug 2021

About Author

Author : Tamanna Inamdar

NA

Related Books