सायबर युद्ध नीती (Marathi)

Deepak Shikarpur

Digital

Available

"सायबर युद्ध नीती'' हे माझे एकतिसावे पुस्तक प्रकाशित करताना मला खूप आनंद होत आहे. मातृभाषेतून आपले विचार मांडण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. एका वेगळ्या विषयावरील पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल विश्वकर्मा प्रकाशनाचे श्री. भारत अगरवाल, विशाल सोनी ह्यांचे मी मनापासून मी आभार मानतो त्याच बरोबर लेखन सहाय्यक श्रीनिवास निमकर ह्यांचेही मी आभार मानतो. माहिती तंत्रज्ञान उर्फ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी) हे शब्द सर्वसामान्यांना माहीत झाले. २००५ नंतर इंटरनेटचा प्रसार शहरी-निमशहरी भागांत वेगाने झाला.

मात्र स्मार्टफोन आणि त्यामध्ये जाऊन बसलेल्या नेट मुळे खर्या अर्थाने माहिती तंत्रज्ञान आम जनतेच्या हातात आले. सर्वाधिक वेगाने प्रसार झालेले इलेक्ट्रॉनिक उपकरण म्हणून आज सेलफोन जगभर ओळखला जातो. गेल्या पाचपंचवीस वर्षांत विद्यान-तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे जगातील सर्व आर्थिक-सामाजिक-राजकीय चित्रे, धोरणे आणि समीकरणे आरपार बदलली! ह्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स व उपग्रहीय संवादमाध्यमांचा फार मोठा वाटा आहे आणि त्यांमध्येही सूक्ष्मतंत्रज्ञान (नॅनो टेक्नॉलॉजी), सर्व संगणकीय वैशिष्ट्ये समाविष्ट असलेला सेलफोन आणि इंटरनेट ह्यांमुळे जगाच्या कानाकोपर्यातल्या माणसांचेही जीवनचित्र पूर्णतः वेगळे झाले (झाले नसले तर लवकरच होईल!).

दळणवळण, वैद्यकशास्त्र अशा काही क्षेत्रांचे रूप तर इतके पालटले आहे की केवळ ३० वर्षांपूर्वीच्या ह्या विषयांतील तज्ञ व्यक्तीलाही गोंधळल्यासारखे व्हावे! ह्याच प्रकारे आणखी एक क्षेत्रातील धोरणांचा आणि साधनांचा मोठ्या प्रमाणात कायापालट झाला आहे युद्ध, युद्धनीती आणि युद्धसाहित्य. बदलत्या तंत्रज्ञानानुसार आजच्या सैनिकाचे आणि युद्धतंत्राचे स्वरूपही खूपच बदलले आहे, युद्ध म्हटले की शत्रूशी प्रत्यक्ष दोन हात करणारे भूदल-नौदल- हवाईदल ह्यांमधील वीरजवान आणि त्यांना आदेश देणारी लष्करी कार्यालये उर्फ 'हायकमांड' अशी दोनच टोके सर्वसामान्य व्यक्तींच्या डोळ्यासमोर तरळतात. हे स्वरूप आता वेगाने बदलत आहे. सर्व गोष्टी स्मार्ट व हाय टेक होत आहेत.

हे पुस्तक इंटरनेट व काही नियतकालिकातील सर्वत्र उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारित आहेत. कुठल्याही देशाची व व्यक्तीची बदनामी करण्याचा कुठलाही हेतू प्रकाशक व लेखकाने ठेवला नाही. ह्या पुस्तकाचा हेतू सर्व सामान्यांना ह्या नवीन तंत्राची व त्याबरोबरच अनुषंगाने येणाऱ्या धोक्यांची माहिती करून देणे हा आहे.

डॉ. दीपक शिकारपूर

   
Language Marathi
ISBN-10 9788192713267
ISBN-13 9788192713267
No of pages 144
Book Publisher Vishwakarma Publications
Published Date 01 Oct 2015

About Author

Author : Deepak Shikarpur

NA

Related Books