राष्ट्रपती-पंतप्रधान : वाद संवाद (Marathi)

Anil Shinde

Digital

Available

राष्ट्रपती व पंतप्रधान हे आपल्या राज्य व्यवस्थेचे दोन प्रमुख घटक . आपल्या संविधानानुसार राष्ट्रपती या देशाचा प्रमुख आहे; पण त्याला कोणतेही कार्यकारी अधिकार नाहीत . पंतप्रधानांची निवड संसद करते व तो कार्यकारी प्रमुख म्हणून काम करतो. या दृष्टीने राष्ट्रपती म्हणजे केवळ "रबरी शिक्का" हे खरे आहे का? याचे उत्तर नाही असे ठामपणे देता येईल.

आपल्या संविधानाने लोकशाहीच्या सुरळीत कारभारासाठी जी अंकुश व्यवस्था निर्माण केली त्यातील हे महत्वाचे घटक आहेत आपल्या संसदीय इतिहासात राष्ट्रपतींनीवेळोवेळी महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत प्रसंगी राष्ट्रपती व पंतप्रधान या सर्वोच्च पदांवरील व्यक्तींमध्ये वाद झाले आहेत ; पण संवादातून समन्वयाची परंपराही त्यांनी जपलेली दिसते. आपली लोकशाही व्यवस्था सुदृढ होण्यात या वाद संवादाचेही मोठे योगदान आहे गेल्या ७० वर्षातील विविध घटना - घडामोडींच्या अनुषंगाने राष्ट्रपती-पंतप्रधान या नात्यावर प्रकाश टाकणारे पुस्तक.

   
Language Marathi
ISBN-10 978-9386455949
ISBN-13 978-9386455949
No of pages 262
Book Publisher Vishwakarma Publications
Published Date 01 Jan 2000

About Author

Author : Anil Shinde

NA

Related Books